Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ई लिलावात एक लाख टनांहून अधिक गहू आणि १०० मेट्रिक टन तांदळाची विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ई लिलावात एक लाख टनांहून अधिक गहू आणि १०० मेट्रिक टन तांदळाची विक्री झाल्याचं ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं जाहीर केलं आहे. या लिलावाचं आयोजन भारतीय अन्न महामंडळानं केलं होतं.

देशातल्या ३६१ गोदामांमधला एक लाख १६ हजार टन गहू आणि एक लाख ४६ हजार टन तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. अन्नधान्यांच्या किंमती स्थिर राखण्यासाठी सरकार कटीबद्ध असून गरज पडली तर बाजारातल्या किंमतींमध्ये सरकार हस्तक्षेप करेल, असं मंत्रालयांनं म्हटलं आहे.

Exit mobile version