भारताचं २०४७ वर्षापर्यंत एक विकसीत राष्ट्र होण्याचं उद्दिष्ट्य असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं २०४७ वर्षापर्यंत एक विकसीत राष्ट्र होण्याचं उद्दिष्ट्य ठेवलं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी आज ओदिशा इथं केलं. कटक इथल्या एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वार्षिक कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी झाल्या होत्या. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याचं शताब्दी वर्ष साजरं करणार आहे. त्या वर्षात आपला देश विकसीत व्हावा, असंच सर्व नागरिकाचं स्वप्न असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात नमूद केलं. भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.वार्षिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांशीही राष्ट्रपतींनी संवाद साधला. वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यां