9 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी 9 ते15 ऑगस्ट दरम्यान देशभरात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. सुमारे सात हजार 500 खंडांमधून निवडलेले युवक नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर एकत्र येतील. पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य कार्यक्रमामध्ये हे युवक आपापल्या राज्यातील सर्व गावं किंवा ग्रामपंचायतींमधून माती घेऊन जाणार आहेत.
मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांच्या तयारीबाबत आढावा बैठक काल नवी दिल्ली इथं ग्रामीण विकास सचिव शैलेश कुमार सिंह आणि युवा कार्य सचिव मीता राजीव लोचन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 12 मार्च 2021 रोजी साबरमती ते दांडी या पदयात्रेने सुरू झाला. आता, मेरी माटी मेरा देश मोहिमेची कल्पना या महोत्सवाचा कळसाध्याय म्हणून करण्यात आली आहे. या मोहिमेत ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम म्हणजेच स्मारक यासह अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.