Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत जगाचं औषधालय बनल असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ आली आहे – डॉ. मनसुख मांडवीय

नवी दिल्ली : “भारत जगाचं औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ आली आहे.” असं केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ‘भारतातील रसायने आणि पेट्रोकेमिकल उत्पादन केन्द्र’ या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित तिसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते. “शाश्वतता आणि वर्तुळाकार परिपूर्णता” ही परिषदेची संकल्पना होती. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघानं (फिक्की) याचं आयोजन केलं होतं. विविध क्षेत्रातील घटकांनी यात भाग घेतला.

Exit mobile version