महिला केंद्रीत विकासाचा दृष्टिकोन महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग – जी 20 देशांच्या महिला सक्षमीकरण गटाच्या बैठकीत प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): महिला केंद्रीत विकासाचा दृष्टिकोन हा महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जी – 20 देशांच्या महिला सक्षमीकरण गटाची मंत्रिस्तरीय बैठक कालपासून गुजरातमधये गांधीनगर इथं सुरु झाली. त्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान बोलत होते. सहकार क्षेत्रात विशेषतः दुग्धव्यवसायात महिलांनी बजावलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. महिलांच्या विकासाकरता सरकार वचनबद्ध असून, मुद्रा योजनेच्या ७० टक्के लाभार्थी महिला असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीच्या निमित्तानं “India @ 75: Contribution of Women’ या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.