गेल्या पाच वर्षात राज्यातल्या दूध उत्पादनात तीन कोटी २० लाख दोन हजार टन इतकी वाढ
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात राज्यातल्या दूध उत्पादनात तीन कोटी २० लाख दोन हजार टन इतकी वाढ झाली आहे. २०२१-२२ यावर्षी राज्यात एक कोटी ४३ लाख टन इतकं दूध उत्पादन झालं आहे. दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी देशातल्या सर्व जिल्ह्यात राष्ट्रीय गोकुळ अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी राज्यांना सोळा गोकुळ आणि दोन राष्ट्रीय कामधेनू प्रजनन केंद्रांच्या स्थापनेसाठी निधी जारी करण्यात आला असल्याचं कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.