निलीमा चव्हाण हिच्या संशयित मृत्यूबाबत लवकरात लवकर तपास व्हावा – चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Ekach Dheya
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील ओमळी गावातील कु. निलिमा सुधाकर चव्हाण ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी उदरनिर्वाहासाठी दापोलीच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करीत होती. शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी दापोली येथून गावी येत असताना, ती अचानक बेपत्ता झाली होती. बर्याच ठिकाणी कुटुंबीयांनी तपास केला. सोशल मिडीयावरती ही बातम्या दिल्या गेल्या, मात्र मंगळवार दि.१ ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळून आला. तिच्या मृतदेहाची अत्यंत क्रुरपणे विटंबना करण्यात आली होती, ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे.
निलीमा चव्हाण हिचा मृतदेह आढळूण आल्यानंतर तालुक्यासह संपुर्ण जिल्हयामध्ये खळबळ उडाली आहे. या हत्याकांडाचा जलद गतीने तपास करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी चिपळूण पोलिस स्टेशन येथे निवेदन देत चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, युवक-युवती, महिला, विद्यार्थी व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. शौकतभाई मुकादम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सौ. दिशाताई दाभोळकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. दादासाहेब साळवी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस डॉ. श्री. राकेश चाळके, चिपळुण माजी पंचायत समिती सभापती सौ. पूजाताई निकम, खेर्डी गणाचे माजी पंचायत समिती सदस्य श्री. नितीन (अबु) ठसाळे, खेर्डी ग्रामपंचायत माजी सरपंच श्री. दशरथ दाभोळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. निलेश कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष सौ. जागृतीताई शिंदे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.