नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या वुहान इथं झालेल्या सातव्या जागतिक दिव्यांग लष्करी स्पर्धांमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकणारा भारताचा दिव्यांग धावपटू सुभेदार आनंदन गुणसेकरन याचा बंगळुरुत मद्रास अभियांत्रिकी गट आणि केंद्रात गौरव करण्यात आला.
सुभेदार यानं १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली होती. जागतिक दिव्यांग लष्करी स्पर्धांच्या टी-44 गटात लष्कराला पदक मिळवून आशियाई विक्रम मोडणारा तो पहिलाचा दिव्यांग धावपटू ठरला आहे.