परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचं गुंतवणुकदारस्नेही धोरण – केंद्रीय अर्थमंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं गुंतवणुकदारस्नेही धोरण आणलं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं. काही धोरणात्मक महत्त्वाची क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीसाठी खुली केली आहेत. २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवल गुंतवणूक आराखड्यात वाढ केली आहे. बँकांची जलद वाढ व्हावी यादृष्टीनं पुनर्भांडवलीकरण, विलीनीकरण आणि त्यांच्या ताळेबंदांचं मजबुतीकरण केलं आहे, असं त्यांनी सांगितलं. २०२२-२३ मधे ४६ अब्ज ३ कोटी अमेरिकी डॉलर्सची थेट परदेशी समभाग गुंतवणूक, तसंच ७० अब्ज ९७ कोटी थेट परदेशी गुंतवणूक देशात आली, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.