राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोहळ्यात प्रधानमंत्र्यांची उपस्थिती
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): गेल्या ९ वर्षांमध्ये सरकारने खादी आणि हातमाग कारागिरांसाठी भरपूर कामं केली असून खादी उत्पादनांमध्ये तिप्पट वाढ झाली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीत प्रगती मैदानावर भारत मंडपम इथं आयोजित ९व्या हातमाग दिनाच्या सोहळ्याला त्यांनी आज संबोधित केलं. यावेळी त्यांनी हातमाग दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. या कार्यक्रमा दरम्यान ते राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेने विकसित केलेल्या ‘भारतीय वस्त्र आणि शिल्प कोश’ या ई-पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय वोकल फॉर लोकल’ या उपक्रमाच्या अनुषंगाने स्वदेशी कापड आणि हातमागांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातले 3 हजाराहून अधिक हातमाग आणि खादी विणकर, कारागीर आणि भागधारक उपस्थित राहणार आहेत. देशाची कला आणि कारागिरीची समृद्ध परंपरा जिवंत ठेवणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन आणि धोरणात्मक पाठबळ देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.