सीजीएसटी आणि आयजीएसटी विधेयकं लोकसभेत चर्चेविना मंजूर
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): लोकसभेत आज केंद्रीय वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३ आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३ चर्चेविना मंजूर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात गदारोळ सुरू असतानाच विधेयकं मांडली. या दोन्ही कायद्यांमध्ये २०१७ च्या कायद्यामध्ये ऑनलाईन गेमिंग संदर्भातल्या सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३मध्ये ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन मनी गेमिंग आणि व्हर्च्युअल डिजिटल एसेट्स या संकल्पनांचा स्पष्टीकरणासह अंतर्भाव केला आहे. तर एकात्मिक वस्तू आणि सेवा कर विधेयक २०२३ मध्ये ऑनलाईन माहिती आणि डेटा संशोधन तसंच रिट्रायवल च्या संकल्पनेतून ऑनलाईन मनी गेमिंग वगळण्यात आलं आहे.