Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चंद्रयान-3 या अंतराळयानानं घेतलेली दोन छायाचित्रं प्रकाशित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्रयान-3 या अंतराळयानानं घेतलेली दोन छायाचित्रं काल रात्री प्रकाशित केली. यानातल्या लँडर इमेजर कॅमेऱ्यानं 14 जुलै 2023 रोजी घेतलेलं पृथ्वीचं छायाचित्र आणि चंद्राच्या कक्षेत यानानं प्रवेश केल्यानंतर लँडर हॉरिझाँटल व्हेलॉसिटी कॅमेऱ्यानं 6 ऑगस्ट रोजी टिपलेलं चंद्राचं छायाचित्र अशी ही दोन छायाचित्रं आहेत.1 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत असताना यानानं घेतलेला एक व्हिडिओही इस्रोनं प्रसारित केला होता. चंद्राच्या कक्षेपासूनचं या यानाचं अंतर तिसऱ्यांदा कमी करण्यात 9 ऑगस्ट रोजी यश आलं. आता हे यान चंद्रापासून फक्त 1437 किलोमीटर अंतरावर आहे.

Exit mobile version