नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन अद्याप अनिशिचता कायम असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी बैठका घेऊन थांबा आणि वाट बघा ही भूमिका घेतली आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळवून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, सत्ता स्थापनेसाठीचे सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहाल करण्यात आले आहेत.
शिवसेना आपल्या समसमान सत्ता वाटपच्या भूमिकेवर ठाम असून, भाजपानं प्रथम राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करावा असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोधाकांच्या बाकावर बसल्याचा निर्णय जाहीर केलं, असून शरद पवार नवी दिल्लीत सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचं वृत्त आहे.
राज्यात सता स्थापनेसाठी शिवसेनेला पांठिबा देण्यावरुन काँग्रेसमधे मतभेद असून, याबाबतचा अंतिम निर्णय सोनिया गांधी घेतील, असं म्हटलं आहे. एकंदरित राज्यात सत्ता स्थापनेवरुन हालचालीना वेग आला असला तरी, अनिश्चितता कायम आहे.