संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं ७ हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी केली प्रदान
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं सुमारे ७ हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी आज प्रदान केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वायू दलासाठी MI 17 V5 हेलिकॉप्टरसाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट खरेदीसाठी मान्यता दिली. युद्धभूमीवर संरक्षणासाठी या सूटचा वापर होतो. भारत इलेक्ट्रॉनिक्स या सूटचा पुरवठा करणार आहे. सैन्यदलासाठी हलक्या मशीन गन खरेदीलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. नौदलाच्या MH 60 R हेलिकॉप्टर करता शस्त्र खरेदीलाही परिषदेनं परवानगी दिली.