नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू वर्षाखेरीपर्यंत देशातल्या मालवाहतुकीच्या खर्चात सध्याच्या ४० टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत कपात होण्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. यामुळे भारत निर्यातीच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक वातावरणात उभा राहील, असं ते म्हणाले.
भारत सध्या रस्ते अपघाताच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असून ही अत्यंत धोकादायक स्थिती असल्याचा गडकरी यांनी सरकार विशेषतः युवकांना आणि बालकांना रस्ता सुरक्षा बाबत साक्षर करत असल्याची माहिती त्यांनी दिली. २०२४ अखेरपर्यंत भारतातले राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा अमेरिकेच्या तोडीच्या होतील असं गडकरी यांनी सांगितलं.