महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेची ६३ वी वार्षिक परिषदेचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : हवामान बदलाचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसत असून, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून द्राक्ष उत्पादकांना वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेची ६३ वी वार्षिक परिषद काल पुण्यात सुरु झाली. या परिषदेचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेला राज्यातून आणि राज्याबाहेरून द्राक्ष उत्पादक सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीपासून द्राक्ष पिकाचं संरक्षण करणाऱ्या प्लास्टिक आच्छादनासाठी, राज्यातल्या शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.