जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केली चिंता
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरण सुसंगत शेती या विषयावरच्या तीन दिवसीय जी- 20 तांत्रिक कार्यशाळेचं उद्घाटन यांच्या हस्ते आज हैदराबादमधल्या शमशाद इथं करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात जी- 20 देश आणि निमंत्रित देशांमधून भारत आणि परदेशातले 100 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, कृषी क्षेत्र हे सर्वात संवेदनशील असल्याचं दिसतं आणि हवामान बदलामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो आणि कृषी क्षेत्रावर हवामान बदलाचा परिणाम अधिक जाणवत आहे.