Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीत एस.सी.ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीनं राबवला जाणारा हा कार्यक्रम येत्या ७ तारखेपर्यंत सुरु होणार आहे. ज्ञानाचा प्रसार, अनुभव तसंच तंत्रज्ञान आणि परस्पर समन्वय याबरोबरच आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची तालीम कायम रहावी या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.

Exit mobile version