जल जीवन अभियानाने ग्रामीण भागात 3 कोटी नळ जोडण्यांपासून 13 कोटींपर्यंतचा टप्पा केवळ चार वर्षात केला पूर्ण
नवी दिल्ली : जल जीवन अभियानाने (जेजेएम) 13 कोटी घरांपर्यंत नळाने पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आज पूर्ण केले आहे. ‘वेग आणि व्याप्ती’ अशा तत्वावर सुरू असलेल्या या आमूलाग्र परिवर्तन घडवणाऱ्या योजनेची सुरुवात, ऑगस्ट 2019 मध्ये झाली, त्यावेळी देशातील ग्रामीण भागात केवळ 3.23 कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा होत असे. मात्र केवळ चार वर्षात ह्या योजनेने, ही संख्या 13 कोटींपर्यंत वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 15 ऑगस्ट 2019 मध्ये , देशाच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. तेव्हापासून, गोवा, तेलंगणा, हरियाणा, गुजरात, पंजाब आणि हिमाचल प्रदेश अशा सहा राज्यांत तसेच पुडूचेरी, दीव आणि दवण, दादरा नगर हवेली आणि अंदमान निकोबार बेटे, अशा तीन केंद्रशासित प्रदेशात या योजनेची 100 टक्के अंमलबजावणी झाली आहे. तर बिहारमध्ये 96.39%, , त्या खालोखाल मिझोराम मध्ये 92.12% अंमलबजावणी झाली असून, येत्या काळात, ही राज्येही 100 टक्के उद्दिष्ट साध्य करणार असून, ते ही ‘हर घर जल प्रामाणित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पंक्तीत जाऊन बसतील. गावकऱ्यांनी आपल्या ग्रामसभेच्या माध्यमातून, संपूर्ण गावात सर्वांच्या घरी तसेच सार्वजनिक कार्यालये/स्थळे इथे नळ आणि नळातून पुरेसे, सुरक्षित आणि नियमित पाणी पोहोचत असल्याची पडताळणी केली आहे. त्यानुसार, देशातील 145 जिल्ह्यातल्या 1,86,818 गावांमध्ये नळाने पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले आहे.
या योजनेची अंमलबजावणी राज्ये’केंद्रशासित प्रदेशांच्या भागीदारीतून केली जाते. तसेच यात, सर्वांचे, म्हणजेच देशात परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या संस्थांचे सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. योजनेअंतर्गत, देशात कुठे ना कुठे, प्रत्येक सेंकदाला नळ जोडणी दिली जात असून, त्यामुळे ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलत आहे. एक जानेवारी 2023 पासून दररोज सरासरी 87,500 नळ जोडण्या दिल्या जात आहेत . उत्तर प्रदेश या राज्याने चालू आर्थिक वर्षात योजनेच्या अंमलबजावणीत आघाडी घेतली असून, त्यांनी जानेवारी 2023 पासून 61.05 लाख घरांमध्ये चालू नळ जोडण्या लावल्या आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जे अथक प्रयत्न केले आहेत, त्यांचा एक परिणाम म्हणून देशातील 9.15 लाख (88.73%) शाळा आणि 9.52 लाख (84.69%) अंगणवाडी केंद्रातही नळ जोडण्या पोहोचल्या आहेत. देशातील 112 आकांक्षी जिल्ह्यात, ज्यावेळी अभियान सुरू झाले त्यावेळी, केवळ या राज्यात एकत्रितपणे केवळ 21.41लाख ( 7.86%) लोकांच्या घरात नळाने पाणी येत होते, मात्र आता ही संख्या 1.81 कोटींपपर्यंत (66.48%).पोहोचवली आहे.
हर घर जल अंतर्गत सुरू असलेल्या अविरत कामाचे फायदे आता दिसू लागले असून, ग्रामीण जनजीवनात यामुळे महत्वाचे सामाजिक-आर्थिक लाभ मिळणार आहे. जेव्हा घरात नळाने नियमितपणे पाणी येतं, त्यावेळी लोकांना विशेषतः महिला आणि युवतींना त्याचे अनेक लाभ मिळत आहेत. कित्येक शतके जडजड बादल्या त्यांना लांबवरून आणाव्या लागत होत्या, ते आता बंद झाले आहे. आणि त्यामुळे वाचणारा त्यांचा वेळ अतिरिक्त उत्पन्न वाढवणे, नवी कौशल्ये शिकणे या सोबतच, मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरता येईल.
योजनांची दीर्घकालीन शाश्वतता साध्य करण्यासाठी, ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनांच्या नियोजन, अंमलबजावणी, संचालन आणि देखभाल (O&M) मध्ये सुरुवातीपासूनच सामुदायिक सहभाग महत्त्वाचा असे म्हटले आहे. जल जीवन मिशन केवळ पाणी पुरवण्यावर नव्हे तर प्रत्येक वेळी दर्जेदार पाणी पुरवठा होईल याची खात्री करण्यावर विश्वास ठेवते. या संदर्भात स्त्रोत आणि वितरण बिंदूंवरील पाण्याचे नमुने नियमितपणे संकलित करून तपासले जातात. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या ब्रीदवाक्यावर काम करत, जल जीवन अभियान,शाश्वत विकास उद्दिष्ट – 6,साध्य करण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. अंगणवाड्या आणि इतर सार्वजनिक संस्था, ग्रामीण भागात म्हणजेच सर्वांसाठी सुरक्षित आणि परवडणारे पाणी, सर्व घरांमध्ये, शाळांना नळांद्वारे सुरक्षित पाण्याची तरतूद करून, ही वाटचाल सुरु आहे.
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा : https://ejalshakti.gov.in/jjmreport/JJMIndia.aspx
#13CrHarGharJal – a water revolution never imagined before.
Our PM @narendramodi Ji’s vision to quench every Indian’s thirst has today ensured 13 crore homes have access to clean tap water.
One tap at a time, a total of 13 crore families have been given a gift of health &… pic.twitter.com/A5knv1T7oL