Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शीत-युद्धा नंतरच्या काळातला सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्याची नाटो देशांची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शीत-युद्धा नंतरच्या काळातला सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्याची नाटो देशांची योजना असून, पुढल्या वर्षाच्या वसंत ऋतूत हा सराव सुरु होईल. या सरावामध्ये  ५०० ते ७०० लढाऊ विमानं, ५० पेक्षा जास्त लढाऊ जहाजं आणि सुमारे ४१ हजार  सैन्य दल सहभागी होईल,अशी अपेक्षा आहे. सरावासाठी रशियाच्या नेतृत्वाखालच्या ‘ऑकॅसस’नावाच्या आघाडी विरोधातलं संभाव्य युद्ध लक्षात घेऊन या सरावाची रचना करण्यात आली आहे. समूहातल्या एका देशावरचा रशियाचा हल्ला थोपवणं, हे या सरावाचं उद्दिष्ट आहे. जर्मनी, पोलंड आणि बाल्टिक देशांमध्ये हा संयुक्त सराव होणार आहे. या संयुक्त सरावात एकूण ३२ देश सहभागी होणार आहेत. स्वीडनला नाटो देशांचं पूर्ण सदस्यत्व देण्याची प्रक्रिया सुरु असूनही  या  सरावात स्वीडन सहभागी होईल, अशी आशा आहे.

Exit mobile version