Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यभरातल्या सव्वा २ हजारांहून अधिक ग्रामपंचातींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, तसंच २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी, येत्या ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मुंबईत ही घोषणा  केली. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. उमेदवारी अर्ज येत्या १६ ते २० तारखेदरम्यान दाखल करता येतील. येत्या २३ तारखेला छाननी होईल. येत्या २५ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं होईल. ५ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदान, तर मतमोजणी ६ नोव्हेंबरला होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी साडेसात ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तिथं ७ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

Exit mobile version