आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत सुमारे ६४ हजार लोकांनी घेतली आपले अवयव दान करण्याची शपथ
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): गेल्या महिन्यात सुरु झालेल्या आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत आता पर्यंत सुमारे ६४ हजार लोकांनी आपले अवयव दान करण्याची शपथ घेतली आहे. ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ म्हणून राबवली गेली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे २ लाख ७० हजार आरोग्य मेळावे आयोजित केले गेले होते. यामध्ये एक कोटी ६१ लाखांहून अधिक लोकांनी लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच या मोहिमेत १४ हजार १५७ रक्तदान शिबिरे घेण्यात आली असून त्यामध्ये सुमारे दोन लाख २८ हजार युनिटस रक्त संकलित करण्यात आलं आहे.