Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशविरोधी कृत्य केल्याबद्दल केंद्र सरकारची एनएलएफटी आणि एटीटीएफ या संघटनांवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ईशान्येकडच्या राज्यातल्या नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा – एनएलएफटी, आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स – एटीटीएफ या दोन संघटनांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. देशविरोधी आणि बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल ही बंदी लावण्यात आली असून ती पाच वर्षांसाठी असेल. याबाबत गृहमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटल आहे की या दोन्ही संघटना आणि त्यांच्याशी संबंधित गटांच्या कारवाया बेकायदेशीर आणि देशाच्या अखंडतेला आणि सर्वभौमत्वाला बाधा आणणाऱ्या आहेत.

Exit mobile version