राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): हळदीचं उत्पादन आणि हळदीची उत्पादनं यांच्या विकासाकरता राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना आज केंद्रसरकारने जारी केली. राष्ट्रीय मसाले मंडळ आणि अन्य शासकीय संस्थांबरोबर हे मंडळ हळद विषयक मुद्द्यांवर संपर्कात राहील. केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. हळदीच्या वापराबाबत जनजागृती करण्यात हे मंडळ महत्त्वाची बूमिका निभावेल असं ते म्हणाले. जगात हळदीचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर हळदीच्या व्यापारातला ६२ टक्के वाटा भारताचा आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमधे हळदीचं उत्पादन होतं.