Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भोसरी विधानसभा खड्डेमुक्त अभियान ; आमदार महेशदादा लांडगे

भोसरी : शहरातील काही भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडतात. यंदा अजून पाऊस सुरूच असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. वाहनचालकांना कसरत करुन वाहन चालवावे लागते.

आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघ खड्डे मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी भोसरीच्या परिपूर्ण विकासासाठी मतदारसंघात खड्डेमुक्त अभियान हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होता. वाहने चालवितांना वाहनचालांकाना कसरत करावी लागते. त्यामुळे पाठीचे, मणक्याच्या आजारामध्ये वाढ होत आहे.

भोसरीत कोठेही, कधीही, केव्हाही, रस्त्यावर किंवा आजूबाजूस खड्डा आढळल्यास त्या खड्याचा फोटो परिवर्तन हेल्पलाईनच्या 9379909090 या व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. फोटो टाकल्यानंतर 24 ते 48 तासात समस्येचे निराकरण केले जाईल.

Exit mobile version