Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तिथे आयटीपार्क होणं आवश्यक आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तिथे आयटीपार्क होणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासाठी कृषी विद्यापीठाची रिकामी ३० हेक्टर जागा वापरावी आणि विद्यापीठाला पर्यायी ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना पवार यांनी काल केली. या संदर्भात मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुण्यानंतर कोल्हापूर हा एक चांगला पर्याय आहे, असंही पवार म्हणाले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी कोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी असे निर्देशही अजित पवार यांनी अन्य एका बैठकीत दिले.

Exit mobile version