Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वित्तीय बाजार अधिकाधिक लोकाभिमुख करुन राष्ट्रीय शेअर बाजारानं आधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीनं उपयोग केला : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्तीय बाजार अधिकाधिक लोकाभिमुख करुन त्यांचा व्यवहार सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजारानं आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या खुबीनं उपयोग केला आहे, असे गौरवोद्गार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काढले.

मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये उपस्थित होते.

देशाला कार्यतत्पर शेअर बाजाराची गरज असून, शेअर बाजाराचा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा नमुना यशस्वी ठरु शकतो हे राष्ट्रीय शेअर बाजारानं दाखवून दिल्याचं त्या म्हणाल्या. अधिकाधिक तज्ञ गुंतवणूकदाराना शेअर बाजाराकडे आकर्षिक करुन घेण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजारानं गुंतवणूकदार प्रोत्साहन कार्यक्रम यशस्वीपणे राबवला, असंही सीतारामन म्हणाले.

Exit mobile version