Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणर नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्र सरकारने आधी मेडिकलच्या जागा वाढवाव्यात आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

मेडिकल पीजी कोर्सला यंदा मराठा आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. अध्यादेशाविरोधातील ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने याआधीच फेटाळली होती. यासाठी सर्वोच्च न्यायालयात येण्याची गरज नव्हती, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं होतं.

दरम्यान, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यर्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार काय पाऊलं उचलणार हे आता पहावं लागेल.

Exit mobile version