Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्वतंत्र, निष्पक्ष आणि प्रलोभनांपासून मुक्त निवडणूका निश्चित करण्यासाठी निवडणूक आयुक्ताचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणूका निष्पक्ष पद्धतीनं झाल्या पाहिजेत आणि ते दिसून आलं पाहिजे. स्वतंत्र, निष्पक्ष आणि प्रलोभनांपासून मुक्त निवडणूका  निश्चित करण्यासाठी निरिक्षकांनी ताळमेळ राखून काम कराव असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. ते काल मिझोराम, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणातल्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निरिक्षकांच्या बैठकीत बोलत होते.

निरिक्षकांनी निवडणूकीचे पावित्र्य राखून सर्व पक्षांना समान संधी देण्याची भूमिका घ्यावी असंही त्यांनी सांगितलं. निरीक्षक हे निवडणूक आयोगाचे महत्वाचे अंग असून त्यांनी निर्भय वातावरणात निवडणूका व्हाव्यात यासाठी मनापासून काम करावे. असंंही त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोग ८० वर्षांहून अधिक वयाच्या, दिव्यांग आणि दुर्गम भागातल्या लोकांना घरातून मतदान करता येईल किंवा त्यांना मतदान केंद्रावर आणण्याची व्यवस्था देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Exit mobile version