Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी भारताच्या भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांचं भारत भेटीसाठी आज भारतात आगमन झालं आहे. या भेटीमुळे विविध क्षेत्रातले भारत आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमधले संबंध अधिक दृढ होतील असं परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था ही आण्विक क्षेत्रातलं सहकार्याचं केंद्र असून आण्विक तंत्रज्ञानाच्या सुरक्षित, काळजीपूर्ण आणि शांततापूर्ण वापराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. भारत १९५७ पासून या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे. तसंच अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, इजिप्त, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे देश या संस्थेचे सदस्य आहेत.

Exit mobile version