निवडणूक आयोगानं मागवल्या राष्ट्रीय माध्यम पुरस्कारांकरता मतदारांसाठी शिक्षण आणि जनजागृती या अभियानासाठी माध्यम संस्थांकडून प्रवेशिका
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं राष्ट्रीय माध्यम पुरस्कारांकरता मतदारांसाठी शिक्षण आणि जनजागृती या अभियानासाठी माध्यम संस्थांकडून प्रवेशिका मागवल्या आहेत. यासाठी १० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येतील. मुद्रित माध्यम, टेलिव्हिजन, रेडिओ, आणि ऑनलाईन असे चार पुरस्कार दिले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रिया, मतदान आणि निवडणुकीशी संबंधित अॅपबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी माध्यम संस्थांच्या उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. याअंतर्गत पुढच्या वर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.