Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदलमंत्री प्रकाश जावडेकर दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यासाठी ढाक्यात पोचले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल, तसंच माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यासाठी ढाक्यात पोचले. बांगलादेशातल्या भारताच्या उच्चायुक्त रिवा गांगुली दास यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं.

जावडेकर दुपारी बांगलादेशाचे माहिती मंत्री हसन महमूद यांना भेटणार आहेत. ते बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मारकालाही भेट देणार आहेत. जावडेकर दक्षिण आशिया सहकारी पर्यावरण कार्यक्रमाच्या संचालक समितीच्या पंधराव्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि भारत हे देश या संघटनेचे सदस्य आहेत.

Exit mobile version