आयुर्वेद केवळ चिकित्सा पद्धती नसून आपले जीवनशैली असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): आयुर्वेद, योगविज्ञान, युनानी ही आपली संस्कृती असून त्याला जगात मान्यता मिळालेली आहे. आयुर्वेद केवळ चिकित्सा पद्धती नसून आपले जीवनशैली आहे, असं केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्लीद्वारे संचालित क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान, नंदनवनच्या वतीनं आणि ८ व्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून नागपूरात काढलेल्या भव्य रॅलीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभेच्छा देतांना बोलत होते. यावेळी क्षेत्रीय आयुवेदिक अनुसंधान संस्थानचे सहायक संचालक डॉ. मिलिंद सुर्यवंशीही उपस्थित होते. या रॅलीमध्ये हजारोंचा सहभाग होता.