इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातल्या सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातील सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हे सातही जण इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरियाशी संबंधित एका कटाचा भाग होते, हे सर्वजण दहशतवादी संघटनांना देशविघातक कारवायांसाठी निधी पुरवण्याचं काम करत होते, असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. इसीससाठी दहशतवादी प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणं, दहशतवाद्यांना आश्रय देणं, स्फोटकं तयार करणं असे आरोप या सर्वजणांविरुद्ध लावण्यात आले आहेत. याशिवाय या सर्वजणांकडे स्फोटक उपकरणं, बंदुका आणि दारुगोळा सापडला आहे. हे सर्वजण इसीस या संघटनेचे सदस्य असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.