Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘ब’ श्रेणीच्या मळीपासून अतिरिक्त इथेनॉल बनवण्याकरता स्वतंत्रपणे पर्यावरण मंजुरी घेण्याची गरज नसल्याची केंद्र सरकारची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘ब’ श्रेणीच्या मळीपासून अतिरिक्त इथेनॉल बनवण्याकरता स्वतंत्रपणे पर्यावरण मंजुरी घेण्याची गरज नसल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकरी आणि साखर उद्योगांना फायदा होणार आहे.

यामुळे प्रदूषणही वाढणार नसल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरुन दिली आहे. विविध साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करतील, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version