Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दिवाळी दरम्यान फक्त संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेतच फटाके फोडले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत.

मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं वायू प्रदूषणावर स्थानिक प्रशासनाला दिशा निर्देश जरी केले आहेत. बांधकामातून बाहेर पडणारं काँक्रीट आणि इतर साहित्य दिवाळीपर्यंत हलवू नये, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

Exit mobile version