विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं – आर के सिंग
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं आहे,असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी म्हटलं आहे.ते आज नवी दिल्लीत सर्व राज्यांच्या ऊर्जा मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या प्रारंभिक सत्रात बोलत होते. गेल्या तीन महिन्यात विजेच्या मागणीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २० टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे.आर्थिक वाढ वीज क्षेत्रावर अवलंबून आहे, असं त्यांनी सांगितलं. देशांतर्गत कोळशाचा वापर आणि कोळशाची उपलब्धता यातली तफावत हे आव्हान आहे.त्यामुळे राज्यांनी नवे वीज प्रकल्प कोळसा क्षेत्रांजवळ उभारावेत,असं ते म्हणाले.