महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे फळपिकांचं नुकसान
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन तीन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. बाधित भागातील पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेतपिकांचं नुकसान झालेल्यांसाठी निधी मागणीचे प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.