भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन किसान १३ ते १७ डिसेंबर २०२३, पुणे
Ekach Dheya
किसानच्या मालिकेतील ३२ वे प्रदर्शन, प्रदर्शन वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत, ४५० पेक्षा अधिक प्रदर्शक, भारतभरातील १००,००० + शेतकरी व उद्योजक, ऑनलाईन नोंदणीला प्रचंड प्रतिसाद, मोबाईल ॲपपवर प्रदर्शक, त्यांची उत्पादने व सेवांची माहिती
भोसरी : भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन “किसान” १३ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे आयोजित होत आहे. १५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ४५० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, ५ दिवसांमध्ये देशभरातून एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
किसान प्रदर्शनाला शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे.
मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील. प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांसाठी स्पार्क या दालनाचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान व नाव कल्पनांना चालना देण्यात येईल.
पूर्वनोंदणी : प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर मोबाईल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे.१८ राज्यातील शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे. प्रदर्शकांची माहिती व संपर्क : किसान मोबाईल ॲपवर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांची माहिती उपलब्ध आहे. नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा प्रदर्शक संस्थांशी संवाद प्रदर्शनाच्या आधीपासूनच सुरु झाला आहे. किसान प्रदर्शनाचे उदघाटन बुधवारी १३ तारखेला सकाळी ९ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात येणार आहे.
किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : www.kisan.in