२०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवणं हे तरुणांचं कर्तव्य – राष्ट्रपती
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवणं हे तरुणांचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. लखनौ आयआयटीच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अभ्यासक्रम भविष्यातील आव्हानांवर मात करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संस्थेत पहिल्यांदाच डिजीटल एमबीए अभ्यासक्रम सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही याप्रसंगी उपस्थित होते.