Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

पुणे : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन तसेच राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना कार्यान्वयीत केलेली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र उद्योग/व्यवसायांतर्गत प्रकल्प किंमत कमाल मर्यादा सेवा उद्योग तसेच कृषि पूरक उद्योग/व्यवसायांसाठी रु.10 लाख व उत्पादन प्रकाराच्या प्रवर्गातील प्रकल्पासाठी प्रकल्प किंमत मर्यादा रु.50 लाख इतकी आहे. तसेच अनुदान मर्यादा ही क्षेत्र व प्रवर्ग निहाय बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या 15 टक्‍के  ते 35 टक्‍के पर्यत आहे. या योजनेचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहे.

 

 एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ घेता येईल.अर्जदार व्यक्तीने यापूर्वी शासनाच्या अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. याप्रमाणे पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी या योजने अंतर्गत त्‍यांचे अर्ज maha-cmegp.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सादर करावेत.

योजना ही सुशिक्षित बेरोजगारांसाठी सहाय्यकारी ठरणार असल्याने व त्यामाध्यमातून रोजगारही उपलब्ध होणार असल्याने सदर योजने अंतर्गत जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा.

 अधिक माहितीसाठी:

 जिल्हा उद्येाग केंद्र,शेतकी कॉलेज आवार, शिवाजीनगर, पुणे कार्यालयाकडे संपर्क करावा.

Exit mobile version