Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘परीक्षा पे चर्चा’चा उद्देश परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं आणि परिक्षार्थींनी हसतखेळत ध्येयप्राप्ती करणं हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या विषयावर थेट संवाद साधणार आहेत. असं या संदर्भातील एक पोस्टमध्ये म्हटलं आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक परीक्षा पे चर्चा २०२४ या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. यामध्ये त्यांना पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी प्राप्त होऊ शकते. या बद्दलची अधिक माहिती इनोव्हेट इंडिया डॉट माय जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Exit mobile version