अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवाला जानेवारीपासून प्रारंभ
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा शतक महोत्सव जानेवारी ते मे २०२४ दरम्यान राज्य शासनातर्फे साजरा करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ही माहिती दिली. हा स्पर्धात्मक महोत्सव मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर जिल्ह्यासह राज्यातल्या २२ केंद्रांवर होणार आहे. यात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री प्रयोग, नाट्य अभिवाचन, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहेत. सर्वोत्कृष्ट स्पर्धकाला रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया नाट्यपरिषदेच्या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर पर्यंत ऑनलाइन पद्धतीनं होणार आहे.