Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कर्ज वितरणापूर्वी अधिक दक्षता घेण्याचं केंद्रिय अर्थमंत्र्यांचं बँकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्तीय परिसंस्था अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी बँका, सुरक्षितता संस्था, नियामक मंडळं आणि तंत्रज्ञानातील तज्ञांच्या दरम्यान सहयोग महत्वाचा असल्याचं आग्रही प्रतिपादन वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आढावा बैठकीत काल नवी दिल्ली इथं त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.

राष्ट्रीय संपत्ती पुनर्रचना कंपनी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी तणावग्रस्त खात्यांबाबत वेगानं निर्णय घेण्यासाठी निकटतम समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना घोटाळ्यांना प्रतिबंध घालण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी ग्राहकांना शिक्षित करावं असं त्यांनी सुचवलं. सर्वच स्तरावर जबाबदारीनं कर्ज प्रक्रिया राबविण्यासाठी वितरणापूर्वी घ्यावयाची दक्षता वाढविण्याचं त्यांनी बँकांना आवाहन केलं.

Exit mobile version