पदव्युत्तर अभ्यासक्रमाची नीट पीजी- २०२४ प्रवेश परीक्षा सात जुलैपर्यंत पुढे ढकलली
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): पदव्युत्तर अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट पीजी- २०२४ प्रवेश परीक्षा सात जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. ही परीक्षा येत्या तीन मार्चला होणार होती. दरम्यान, राष्ट्रीय एक्सिट टेस्ट अर्थात नेक्स्ट ही राष्ट्रीय स्तरावरची वैद्यकीय परीक्षा एक वर्ष उशिरा होणार असून, ती आता २०२५ मध्ये घेतली जाणार आहे.
पीजी प्रवेशासाठी नेक्स्ट ही प्रवेश परीक्षा प्रत्यक्ष कार्यान्वित होईपर्यंत नीट-पीजी हीच परीक्षा सर्व वैद्यकीय परीक्षांसाठी ग्राह्य धरली जाईल, असं पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अधिनियम – २०२३ अंतर्गत अधिसूचित करण्यात आलं आहे.