चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त झालं आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या कर संकलनाहून हे १७ टक्केने जास्त आहे.हे संकलन २०२३-२४ या वर्षासाठीच्या एकूण अर्थसंकल्पीय निधीच्या ऐंशी टक्के आहे,असं अर्थमंत्रालयानं म्हटलंआहे. कॉर्पोरेट आयकराचा वृद्धीदर ८ पूर्णांक ३२ शतांश टक्के तर व्यक्तिगत आयकराचा वृद्धीदर २६ टक्क्यांहून अधिक आहे.यावर्षी आतापर्यंत २ लाख ४८ हजार कोटी रुपये परताव्यापोटी दिले गेले आहेत.