इस्रो करणार इन्सेट ३ डी एस या अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता इन्सेट ३ डी एस या अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. हवामानाची अचूक माहिती आणि अंदाज मिळवण्यासाठीच्या इन्सेट-3 मालिकेतल्या उपग्रहामधल्या ६ वेगवेगळ्या भूस्थिर उपग्रहांपैकी हा सहावा उपग्रह आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार असलेल्या या उपग्रहाचे प्रक्षेपण नागरिकांना पाहता यावे यासाठी इस्रोने विशेष सोय केली आहे.