Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ उच्चस्तरीय समितीची देशातील आघाडीच्या अर्थतज्ञांसोबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक राष्ट्र, एक निवडणूक यावरील उच्चस्तरीय समितीनं काल देशातील आघाडीच्या काही अर्थतज्ञांसोबत चर्चा केली. पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग आणि नाणेनिधीच्या डॉक्टर प्राची मिश्रा यांनी सह-लेखन केलेला एक निबंध या समितीला सादर केला. एकाचवेळी निवडणुका घेण्याचे व्यापक आर्थिक परिणाम, तसंच वारंवार होणारे खर्च, सकल देशांतर्गत उत्पादन, गुंतवणूक, विस्तारित सार्वजनिक खर्च, वित्तीय तूट, शिक्षण, आरोग्य आणि कायदा तसंच सुव्यवस्थेची स्थिती अशा सर्व मुद्यांचा आढावा या निबंधात घेण्यात आला आहे. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती या निबंधावर व्यापक चर्चा करणार आहे. गुजरातचे निवडणूक आयुक्त संजय प्रसाद यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आवश्यक विविध बाबी ठळकपणे समितीसमोर मांडल्या आहेत.

Exit mobile version