Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ५८ वरून ६० वर नेण्याच्या निर्णयाला जयंत पाटील यांचा विरोध

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ५८ वरून ६० वर नेण्याच्या निर्णयाला आपला विरोध असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवली तर शासन सेवेतली पदं रिक्त होणार नाहीत आणि नवीन रोजगार निर्माण होणार नाही आणि त्यामुळे युवा वर्गात निराशा आणि असंतोष निर्माण होईल असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून, आपल्या पत्राची त्यांनी दखल घ्यावी, आणि   सेवा निवृत्तीचं वय वाढवण्याचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती केल्याचं जयंत पाटील यांनी  समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं  आहे.

Exit mobile version