राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातल्या ६ जागांसाठी दाखल झालेल्या ७ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आज पडताळणीअंती बाद ठरल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे उमेदवार आहेत.